प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी पंढरीच्या वारीला जावे-मोदी

0 1

नवी दिल्ली-पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मन की बात कार्यक्रमाद्वारे देशवासियांना संबोधित करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा 46 वा मन की बात कार्यक्रम आहे. दरमहिन्याच्या अखेरच्या रविवारी पंतप्रधान या कार्यक्रमाद्वारे देशातील जनतेला संबोधित करतात. पंढरपूरची वारी म्हणजे अद्भूत यात्रा आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातच्या माध्यमातून सांगितले. देशातील प्रत्येक नागरीकाने पंढरपूरच्या वारीला एकदातरी जावे असे आवाहनही पंतप्रधान मोदींनी केले. कार्यक्रमात कोल्हापूरच्या एका व्यक्तीने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना पंतप्रधान मोदींनी पंढरपूरच्या वारीवर भाष्य केले.