मोदी, शहा अडवाणींच्या भेटीला; वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन

0

नवी दिल्ली: भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा आज ९२ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री भाजपचे अध्यक्ष अमित शहा, कार्याध्यक्ष जे.पी.नड्डा आदींनी अडवाणींच्या घरी जाऊन त्यांची भेट घेत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

या लोकसभा निवडणुकीत भाजपने अडवाणी यांना उमेदवारी दिली नव्हती, त्यावरून भाजपवर अनेक टीकाही झाली, मात्र वयाचा विचार करून अडवाणी यांनी स्वत: उमेदवारी घेतली नसल्याचे सांगण्यात आले. अडवाणी यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्यासोबत काम केले आहे. भाजपच्या स्थापनेपासून ते भाजपात कार्यरत आहेत. जनसंघापासून त्यांनी पक्षाला वाढविण्यासाठी प्रयत्न केले आहे.