स्व.राजीव गांधींना पुण्यतिथीनिमित्त मोदींकडून श्रद्धांजली

0 2

नवी दिल्ली: माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांची आज पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधींना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ट्वीट करत मोदींनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

लोकसभा निवडणुकीत मोदींनी राजीव गांधी यांच्यावर आरोप करत मते मागितली होती. यावरून बराच वादंग निर्माण झाला. दिवंगत पंतप्रधानाबाबत टीका केल्याने मोदींवर विरोधकांनी बरीच टीका केली होती. दरम्यान आज राजीव गांधींची पुण्यतिथी असल्याने मोदींनी श्रद्धांजली अर्पण केल्याने विशेष वाटत आहे.