Sunday , September 23 2018
Breaking News

राजकारण

यूपीए सरकारनेच रिलायन्सशी बोलणी केल्याचे पुरावे : रविशंकर प्रसाद

दिल्ली :राफेल करारावरून टीका करताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना चोर म्हटले. तसेच फ्रान्सने दिलेल्या अधिकृत स्पष्टीकरणाचाही संदर्भ त्याला जोडला आणि ओलांद यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चोर म्हटले आहे असा दावा राहुल गांधी यांनी केला. देशाच्या पंतप्रधानाबाबत एकाही पक्षाच्या अध्यक्षाने कधीही अशाप्रकारे शब्द वापरून इतक्या खालच्या पातळीची टीका …

अधिक वाचा

नरेंद्र मोदी यांनी अनिल अंबानी यांच्या कंपनीला दिले ३० हजार कोटींचं ‘गिफ्ट’

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा आरोप नवी दिल्ली : राफेल कराराच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योगपती अनिल अंबानी यांच्या कंपनीला ३० हजार कोटींचं गिफ्ट दिले असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केला. त्याआधी राहुल यांनी ट्विटरच्या माध्यमातूनही पंतप्रधानांवर जोरदार टीका केली होती. फ्रान्सचे …

अधिक वाचा

राफेल खरेदीच्या माध्यमातून सैन्यावर सर्जिकल स्ट्राइक – राहुल गांधी

नवी दिल्ली : सर्जिकल स्ट्राइक दिन महाविद्यालयांमध्ये साजरा करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावरून वाद निर्माण झाले असतानाच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. राफेल खरेदीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैन्यावर १ लाख ३० हजार कोटींचा सर्जिकल स्ट्राइक केला आहे असा गंभीर आरोप राहुल यांनी केला. राहुल …

अधिक वाचा

शरद पवारांनी फसवा-फसवी केली तर आम्ही बघून घेऊ – उदयनराजे भोसले

सातारा : शरद पवारांनी फसवा-फसवी केली तर आम्ही बघून घेऊ, असा इशाराच ‘राष्ट्रवादी काँग्रेस’चे खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला आहे . राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार आज कर्मवीर जयंतीनिमित्त कार्यक्रमासाठी सातारा दौऱ्यावर आले आहेत. पवारांशी बंद खोलीत चर्चा केल्यानंतर गाडीत बसताना खासदार उदयनराजे यांनी हा इशारा दिला आहे. खासदार उदयनराजे …

अधिक वाचा

बच्चू कडू जालन्यातून निवडणूक लढणार, दानवेंना आव्हान

अमरावती : शेतकऱ्यांना साले म्हणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरोधात अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी जालना येथून लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. जालन्यातून दानवेंचा पराभव करूनच परत येऊ, असा निर्धारही बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत दानवे यांच्यासमोर आमदार बच्चू कडू याचं मोठं आव्हान …

अधिक वाचा

लैंगिक अत्याचाराच्या निषेर्धात राष्ट्रवादीचे आंदोलन

पिंपरी : संत तुकाराम सहकारी साखर कारखाना, कासारसाई येथे ऊसतोड कामगारांच्या अल्पवयीन मुलींवर झालेल्या बलात्काराच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी-चिंचवड शहर महिला विभागाच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी शहराध्यक्षा वैशाली काळभोर व शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. आंदोलन करण्यात आले. यावर सर्व महिला …

अधिक वाचा

तर महाराष्ट्राची राज्य भाषा गुजराती आणि गांधीनगर राजधानीच करून टाका – धनंजय मुंडे

राज्यातील शिक्षकांना गुजराती चॅनेलवरून धडे बीड : महाराष्ट्रातील अभ्यासक्रमाच्या पुस्तकात गुजरातीचे धडे छापून झाले आता मराठी शिक्षकांनाही गुजराती वाहिनीवरून धडे देण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे. शासनाचा हा निर्णय म्हणजे सरकारचा महाराष्ट्राचे संपूर्ण गुजरातीकरण आणि लांगुलचालन करण्याचा निषेधार्ह प्रकार असल्याची संतप्त टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते …

अधिक वाचा

कोणाच्याही निवडणूक प्रचारात भाग घेणार नाही – फेसबुक

सॅन फ्रान्सिस्को : अमेरिकेत २०१६ मध्ये झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये प्रचारात सक्रिय सहभाग घेणाऱ्या फेसबुकने यापुढे कुणाचाही निवडणूक प्रचार करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या २०१६ मध्ये निवडणूक प्रचारासाठी त्यांच्या कार्यालयात कर्मचाऱ्यांना पाठवण्यात आले होते. मात्र आता कोणाच्याही निवडणूक प्रचारात भाग घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना पाठवण्यात येणार नसल्याचं फेसबुकने स्पष्ट …

अधिक वाचा

काँग्रेससोबत युती करायची इच्छा; पण राष्ट्रवादीसोबत कदापी नाही – प्रकाश आंबेडकर

5prakash-ambedkar

मुंबई : काँग्रेससोबत युती करायची आमची इच्छा आहे, पण आम्ही राष्ट्रवादी काँग्रेससोबत कदापी एकत्र येऊ शकत नसल्याचे भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. कारण, भिडेंची पिलावळ राष्ट्रवादीमध्ये सक्रीय असल्याचे त्यांनी म्हटले. मुंबईतील पत्रकार परिषेत काँग्रेसचे कौतूक करताना राष्ट्रवादीवर कडाडून टीका करत संघ परिवार आणि मोहन भागवत …

अधिक वाचा

उत्तराखंडमध्ये गायीला ‘राष्ट्रमाते’चा दर्जा ; विधेयक मंजूर

डेहराडून : उत्तराखंडमध्ये गायीला राष्ट्रमातेचा दर्जा देणारं विधेयक उत्तराखंडच्या विधानसभेत मंजूर करण्यात आलं आहे. हे विधेयक आता केंद्राच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. सत्ताधारी आणि विरोधक दोघांनाही गायीचं महत्त्व माहीत आहे. केवळ भारतातच नव्हे तर इतर देशातही गायीला खूप महत्त्व आहे. त्यामुळेच गायीला राष्ट्रमातेचा दर्जा देण्यात आल्याचं उत्तराखंडच्या पशूपालन मंत्री रेखा …

अधिक वाचा
error: Content is protected !!