Monday , July 23 2018

पुणे

तळेगाव-दाभाडे रेल्वे पुलावरील झाडी वाढली

 पुलाच्या दुरूस्तीची प्रवाशांची मागणी तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे परिसरात जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे रेल्वे पुल परिसरात भरपूर झाडी वाढली आहे. या झाडीमुळे हा मार्ग दिसून येत आहे. येथील ब्रिटिशकालीन रेल्वे पुलाच्या भिंतीमध्ये व त्याच्या बोगद्याच्या दुतर्फा दाट झाडी वाढल्याने मार्ग धोकादायक बनला आहे. त्यामुळे सुमारे 120 वर्षांपूर्वीच्या पुलाचे …

अधिक वाचा

शासकीय दवाखान्यात ओपीडी तात्काळ सुरु करावा

नगरपरिषदेने मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी लोणावळा : लोणावळा नगरपरिषदेचा दवाखाना शासनाच्या आरोग्य विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आला आहे. तो सुरु होण्यास काही कालावधी लागणार असल्याने तोपर्यंत शहरात ओपीडी व ऑपरेशन थिएटर सुरु करण्याचे आदेश आरोग्य विभागाला देण्यात यावेत अशी मागणी लोणावळा नगरपरिषदेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. नगरपरिषदेचे डॉ. बाबासाहेब डहाणुकर रुग्णालय …

अधिक वाचा

पुर्नवसनासह अनेक मागण्या मान्य करण्यासाठी शासनाकडून उदासिनता

पिंपरी-चिंचवडला पाणी नाही देणार प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांचा ठाम विरोध टाकवे बुद्रुक : पिंपरी-चिंचवड महानगराची दिवसेंदिवस लोकसंख्या वाढते आहे. औद्योगिक परिसर असल्याने येथे जास्त पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे पवना धरणातील पाणीसाठा कमी पडतो आहे. वाढणारी लोकसंख्या पहाता काही दिवसांमध्ये हे पाणी पुरण्याची शक्यता कमी दिसते. त्यामुळे आंद्रा धरणातून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी देण्यासाठी विचार …

अधिक वाचा

‘मिसेस इंडिया’ या स्पर्धेत कोमल साळुंखेंनी पटकाविला महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक

तलवारबाजी करून मिळविली वाहवा भोसरी : येथील शाहु शिक्षण संस्थेच्या विश्‍वस्त कोमल अजय साळुंखे यांनी दिल्ली येथे झालेल्या ‘मिसेस इंडिया-शी इज इंडिया’ या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक आणि राष्ट्रीय पातळीवर आठव्या क्रमांकाचा किताब पटकाविला. देशस्तरावर फॅशन इंडस्ट्रीजमध्ये सोळा वर्षांचा अनुभव असणार्‍या डॅमसाई कंपनीने ‘डॅमसाई मिसेस युनिव्हर्स मिसेस अर्थ’ अंतर्गत …

अधिक वाचा

 खड्डे बुजवण्याचे काम सुरू

रहाटणी : पिंपळे सौदागर परिसरात रहाटणीतील कोकणे चौक ते लिओन ओर्बिट सोसायटी येथे चालू असलेल्या मुख्य रस्त्याच्या कामामुळे सेवा रस्त्यावर खड्डे पडले होते. नगरसेवक नाना काटे यांनी महापालिकेच्या संबंधित अधिकार्‍यांना खड्डे लवकरात लवकर बुजवण्यात यावे अशा सूचना देण्यात आल्या. ते खड्डे पालिकेच्यावतीने आधुनिक पद्धतीने बुजवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. …

अधिक वाचा

18 विद्यार्थ्यांना सायकल वाटप

पिंपरी : येथील ह्युमन्स सोसायटीच्यावतीने प्रयोगवन परिवार आणि टीम एकलव्यच्या सहयोगाने राबविले जाणार्‍या सायकलदान महाअभियानच्या अंतर्गत अहमदनगर येथील पिंपरकरणे गावात 18 विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आले. यावेळी रेडिओ सिटीच्या आर. जे. सोनाली, प्रयोगवन परिवाराचे अध्यक्ष सत्तार शेख, ह्युमन्स सोसायटीच्यावतीने समाधान पाटील, गडवाट परिवाराचे बीएसएफ फोडसे, संदीप दराडे आणि शाळेतील अध्यापक आदी …

अधिक वाचा

 दिघीकरांना मिळणार माफक दरात भाजीपाला

शेतकरी आठवडे बाजारचे रविवारी उद्घाटन  पिंपरी : महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळ यांच्या सहकार्याने जगदंब अ‍ॅग्रोटेक फार्मर्स प्रोड्युसर कंपनी, नगरसेवक विकास डोळस आणि कुलदीप परांडे यांच्या संयुक्त विद्यमाने दिघीत शेतकरी आठवडे बाजारचे दर रविवारी आयोजन करण्यात येणार आहे. यामुळे दिघीकरांना ताजा आणि माफक दरात भाजीपाला मिळणार आहे, अशी माहिती नगरसेवक …

अधिक वाचा

18 वर्षांच्या लढ्यास यश; महापालिकेला उच्च न्यायालयाचा आदेश

सफाई कंत्राटी कामगारांना तीन महिन्यात फरकाची रक्कम द्या राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांची माहिती पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कंत्राटी सफाई कर्मचार्‍यांना किमान वेतनाच्या फरकाची रक्कम देण्यात यावी, यासाठी गेल्या 1 वर्षांपासूनच्या राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या लढ्याला यश आले आहे. 572 कंत्राटी कर्मचार्‍यांच्या नावांची छाननी करा. फरकाच्या रकमांची तपासणी करुन …

अधिक वाचा

अनमोलरत्न ग्रुपकडून सांगवडे शाळेस साहित्य वाटप

पिंपरी : सांगवडे येथील जि. प. प्राथमिक शाळेत पालखी सोहळ्यानिमित्त वृक्षदिंडी आणि प्रभात फेरी काढण्यात आली. यावेळी मुलांनी भजन, हरिपाठ व फुगडी घालून आनंद उत्सव साजरा केला. अनमोलरत्न ग्रुपतर्फे मुलांना स्कुलबग्ज, वह्या, पेन अशा प्रकारचे साहित्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य विक्री व सेवा कर उपायुक्त विकास शेवाळे, …

अधिक वाचा

रोटरी क्लब ऑफ पिंपरीच्या अध्यक्षपदी नितीन ढमाले

पिंपरी-चिंचवड : रोटरी क्लब ऑफ पिंपरीच्या अध्यक्षपदी उद्योजक रो. नितीन ढमाले यांची निवड करण्यात आली. तर, सचिवपदी रो.विजय नाईक, खजिनदारपदी रो. परिमल दाभाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चिंचवड येथील रोटरी सेंटरमध्ये रविवारी (दि.15) हा पदग्रहणाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. डॉ. शैलेश पालेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित …

अधिक वाचा
error: Content is protected !!