रनिंग स्टाफचे सामूहिक रजा आंदोलन, प्रशासनाच्या कामगारविरोधी धोरणाचा करणार निषेध
जळगाव । रेल्वेच्या वाहतूक व्यवस्थेत महत्त्वाचा घटक असलेल्या रनिंग स्टाफने 28 मार्चला एक दिवसीय सामूहिक रजा व धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या दिवशी रेल्वे सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
नॅशनल रेल्वे मजदूर युनियनद्वारे नुकतीच रनिंग स्टाफची बैठक घेण्यात आली. यात कर्मचार्यांच्या समस्यांवर चर्चा झाली. लोको पायलट व गार्ड पायलटला दररोज 10 ते 12 तास गाडी चालवावी लागते, साप्ताहिक सुटी दिली जात नाही, गार्ड उपलब्ध असूनही अनेकदा विना गार्ड मालगाडी चालविली जाते, रात्रीच्या वेळेस विना गार्ड व विना टेल लॅम्प मालगाडी चालविल्या जातात, कर्मचार्यांच्या सुरक्षेला प्राधान्य न देता असुरक्षितपणे गाड्या चालविल्या जात असल्याच्या गंभीर समस्यांवर चर्चा करण्यात आली. चुकीच्या निर्णयांमुळे रनिंग कर्मचारी ‘मेडिकली डी कॅटगराईज’ होत असल्याचा संतप्त सूरही यावेळी उमटला. रेल्वे प्रशासनाच्या कामगारविरोधी धोरणांमुळे या समस्या उद्भवल्या असून, त्या विहीत मुदतीत न सुटल्यास नॅशनल रेल्वे मजदूर युनियन रनिंग शाखेद्वारे 28 मार्च रोजी, एक दिवस सामूहिक रजा आणि मंडळ रेल्वे प्रबंधक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
अध्यक्षस्थानी आर.पी. भालेराव होते. मंडळ सचिव आर. आर. निकम, शाखा सचिव ए. टी. खंबायत, एस. बी. तळेकर, प्रदीप गायकवाड, डी. बी. महाजन, मो. असलम, एस. एस. वानखेडे, अनिल मालवीय, डी. आर. सयाम, आर. एम. सिंग, एच. के.चौरसिया, सैय्यद सादिक, चेतन चौधरी, जे. एस. पाटील, कमालद्दीन, संजीव श्रीनाथ, सरबजित सिंग, अकील अहमद, ए.बी.भोसले, योगेश व्यवहारे, एम. पी. चौधरी, किरण नेमाडे, संदीप पाटील, जे. एस. सोनवणे, एन. जी. सिरसाठ, एम.आर.खान, सी.वी.शुक्ला, जी.बी.शिरसाठ, कमलेश शुक्ला, पी. ए. सैनवाल, टी. आर. गायकवाड, एन. सी. पाटील, जे. एस. राणे, ए. बी. महाजन, योगेश विनंते, हरिमोहन मीना, शेख इब्राहीम, जी. एल. भोले, एस. बी. शैदांते, बी.पी.पाटील, एस.एस.सुरवाडे, अमित कुमार एन. एस. शिंदे, आशिष यादव, इसरार खान सभेला उपस्थित होते.