संघाची 2024 मध्ये संविधान बदलविण्याची भूमिका

0 2

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

जळगाव – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने 2024 मध्ये देशाचे संविधान बदलविण्याची भूमिका घेतली असून, त्यांना मनुवादी संविधान आणायचे आहे, असा खळबळजनक आरोप भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. ते अजिंठा विश्रामगृहात आयोजित पत्रपरिषदेत बोलत होते.

अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले की, काँग्रेससोबत समझोता करतांना होणारी चर्चा चार महिन्यांपासून अजेंड्यासाठी थांबलेली आहे. जोपर्यंत काँग्रेस संघाला संविधानाच्या चौकटीत आणण्यासाठी अजेंडा दाखवत नाही तोपर्यंत चर्चा होणार नाही. काँग्रेस मागील तीन पंचवार्षिकमध्ये ज्या मतदारसंघात हरला आहे त्या मतदारसंघातील 12 जागा वंचित बहुजन आघाडीला सोडव्यात, अशी मागणीही त्यांनी केली. याआधी आम्ही जे उमेदवार जाहीर केलेले आहेत ते माघार घेणार नाहीत असेही अ‍ॅड. आंबेडकर यांनी स्पष्ट केले.