एसबीआयची लवकरच ‘योनो’डिजीटल सेवा

0

नवी दिल्ली-स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय)डेबीट कार्ड सेवा बंद करुन त्याऐवजी ‘योनो’ डिजीटल पेमेंट प्रणाली कार्यान्वीत करणार आहे. ही प्रणाली लवकरच सुरु करण्यात येणार आहे. यासंदर्भात एसबीआयचे चेअरमन रजनीशकुमार यांनी एका कार्यक्रमात याबाबत संकेत दिले आहे. त्यांनी म्हटले की, सध्या मोठ्या प्रमाणावर वापरात असलेली डेबिट कार्ड सेवा बंद करण्याची आमची योजना आहे. देशात सध्या 90 कोटी डेबिट कार्ड आणि कोटी क्रेडिट कार्ड वापरात आहेत. डेबीट कार्ड बंद केल्यानंतर ‘योनो’ डिजीटल प्रणालीवर भर असणार आहे.