क्रिकेटपटू सिद्धूची हकालपट्टी

0

नवी दिल्ली । पुलवामा हल्ल्यानंतर वादग्रस्त वक्तव्य करणारा क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धूची अखेर कपिल शर्मा शो मधून हकालपट्टी करण्यात आली असल्याचे वृत्त एका इंग्रजी वाहिनीने दिले आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर नवज्योत सिंग सिद्धू यांनी पाकिस्तानशी चर्चा करून तोडगा काढला पाहिजे असे म्हटले होते. मूठभर लोकांसाठी तुम्ही पाकिस्तानला दोष का देता? मी झालेल्या हल्ल्याचा निषेध करतो, मात्र पाकिस्तानशी चर्चा करूनच हा प्रश्न सोडवला पाहिजे, अशी प्रतिक्रिया नवज्योत सिंग सिद्धू यांनी पुलवामा अतिरेकी हल्ल्यानंतर दिली होती. त्यांच्या या ट्विटनंतर नेटकर्‍यांनी टीकेचा भडीमार करत कपिल शर्मा शोमधून सिद्धूंना हाकला अशी मागणी केली होती.