चार दिवस आधीच मान्सून येणार

0
स्कायमेटचा दिलासादायक अंदाज
केरळ :- स्कायमेटने दिलासादायक अंदाज वर्तवला आहे. केरळमध्ये मान्सून साधारणत: एक जूनला दाखल होतो. मात्र यंदा तो चार दिवस आधीच म्हणजे 28 मे रोजीच केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज स्कायमेटकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे २८ मे रोजी मान्सूनचे केरळमध्ये आगमन अपेक्षित असून त्यात दोन दिवस पुढे– मागे होण्याची शक्यता गृहीत धरण्यात आली आहे.
मान्सून 20 मे रोजी अंदमान आणि निकोबार बेटावर पोहोचेल. यानंतर तो 24 मे रोजी श्रीलंकेत दाखल होईल आणि त्यानंतर बंगालच्या उपसागरावरुन मान्सूनचा प्रवास सुरू होईल, असा अंदाज स्कायमेटनं व्यक्त केला आहे. मान्सूनच्या केरळमधील आगमनानंतर हवामान अनुकूल असल्यास साधारण आठवडाभरात मान्सून महाराष्ट्रात दाखल होत असतो. यापूर्वी स्कायमेट आणि भारतीय हवामान विभागाने देशात पाऊस सामान्य राहील अशी शक्यता वर्तवली होती.