Wednesday , November 21 2018
Breaking News

राज्य

पुलगावातील केंद्रीय दारुगोळा भांडारात स्फोट; सहा जण ठार

वर्धा- सैन्य दलासाठी बॉम्ब, हातबॉम्ब, अग्निबाण, दारूगोळा, अद्ययावत शस्त्रास्त्रांचा साठा करणाऱ्या वर्धा येथील पुलगावातील केंद्रीय दारूगोळा भांडारात जुने बॉम्ब निकामी करताना स्फोट झाला आहे. या स्फोटात सहा जण ठार तर ११ जण जखमी झाले आहे. आज सकाळी ५.३० वाजेच्या सुमारास मुदतबाह्य बॉम्ब निकामी केले जात होते. यादरम्यान सहा जणांचा मृत्यू …

अधिक वाचा

साताऱ्यात मुसळधार पाऊस; ओढे, नाले तुडूंब

सातारा – साताऱ्यासह माण, खटाव, फलटण, वाई, महाबळेश्वर तालुक्यात आज मंगळवारी सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. माण तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी पाऊस झाल्याने दुष्काळी परिस्थिती ओढे, नाले, बंधारे भरून वाहू लागले आहेत. माण तालुक्याच्या पूर्व भागात सोमवारी हजेरी लावलेल्या पावसाने आज पहाटेपासून पुन्हा जोरदार हजेरी लावली. पश्चिम भागातील धामणी, गोंदवले, …

अधिक वाचा

गडचिरोलीत दोन महिला नक्षलवादी ठार

गडचिरोली-गडचिरोली जिल्ह्यात पोलीस दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन महिला नक्षलवाद्यांना ठार करण्यात यश आले आहे. आज सकाळी साडेआठच्या सुमारास धानोरा तालुक्यातील निहालकाय जंगलात ही चकमक झाली. पोलिसांच्या अल्ट्रा आणि सी-६० पथकातील जवानांनी ही कामगिरी केली. सुरक्षादलाकडून रविवारी रात्रीपासून नक्षलविरोधी मोहीम सुरु होती. त्याचवेळी नक्षलवाद्यांनी सुरक्षा पथकावर हल्ला केला. सुमारे …

अधिक वाचा

शौर्यवान शहीद जवान केशव गोसावींना कन्यारत्न!

नाशिक- जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्याच्या नौशेरा सेक्टरमध्ये सीमेवर गस्त घालणारे नाईक केशव सोमगीर गोसावी (२९) हे भारतीय लष्कराचे जवान पाकने केलेल्या गोळीबारात रविवारी शहीद झाले. दरम्यान शहीद जवानाच्या पत्नीला कन्यारत्न झाले आहे. अपत्याला लष्करात भरती करण्याचे स्वप्न केशव गोसावी यांनी उराशी बाळगले होते. परंतु स्वप्न पाहणाऱ्या केशव गोसावी यांना मुलीच्या जन्माच्या …

अधिक वाचा

मराठा आरक्षण: बुधवारी कोर्टात सुनावणी

मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात बुधवारी 21 नोव्हेंबर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. याचिकाकर्त्यांकडून मागास प्रवर्ग आयोगाचा अहवाल हायकोर्टासमोर सादर करण्याची मागणी करण्यात आली आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकर निकाली काढावा यासाठी विनोद पाटील यांची हायकोर्टात याचिका दाखल केली होती. Share on: WhatsApp

अधिक वाचा

सरकारकडून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो-अजित पवार

मुंबई- विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. अजित पवारांनीही सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. विरोधकांचे म्हणणे सरकार ऐकून घेत नाही. विरोधकांचे म्हणणं विचारात घेऊनच अंतिम निर्णय घ्यायला पाहिजे. सरकारच्या अशा भूमिकेमुळे समाजाला न्याय मिळणार काय, याबद्दल आम्ही साशंक आहोत. विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न राज्यकर्त्यांनी …

अधिक वाचा

अटल बिहारी वाजपेयी यांच्या रूपाने विचारांचा महासागर देशाने गमविले-मुख्यमंत्री

मुंबई-आजपासून राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु झाले आहे. अधिवेशनाचा आज पहिलाच दिवस आहे. यावेळी माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाने शोकप्रस्ताव मांडण्यात आला. यावेळी अटल बिहारी वाजपेयी यांना आदरांजली वाहण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अटल बिहारी वाजपेयी यांना आदरांजली वाहत त्यांच्या कार्याची माहिती दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र …

अधिक वाचा

विधानभवनासमोर विरोधकांची घोषणाबाजी

मुंबई- आजपासून राज्याच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. दरम्यान विविध प्रश्नावरून विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यावर बसून शर्कर विरोधात घोषणाबाजी केली. दुष्काळसह अनेक मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला लक्ष केले आहे. मुख्यमंत्री विधान भवनात जात असतांना विरोधकांनी घोषणाबाजी केली. मराठा, मुस्लिम, धनगर समाजाला आरक्षण द्या अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. Share …

अधिक वाचा

आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात

मुंबई – राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. 30 नोव्हेंबरपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. रविवार, ईद आणि गुरुनानक जयंतीच्या सुट्टया वगळता फक्त आठ दिवस अधिवेशनाचे कामकाज होणार आहे. हिवाळी अधिवेशनात दुष्काळ, कर्जमाफी, मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि विविध मंत्र्यांवर झालेले आरोप या मुद्यांवरून सरकारला धारेवर धरण्याची तयारी विरोधकांनी केली …

अधिक वाचा

प्रेमीयुगुलाने वैनगंगा नदी पात्रात उडी घेऊन केली आत्महत्या

भंडारा : वैनगंगा नदी पात्रात प्रेमीयुगुलाने उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शहरालगतच्या कारधा येथे रविवारी सकाळी 10 वाजता सदरील घटना उघडकीस आली. एकमेकांचे हात ओढणीने बांधून त्यांनी नदी पात्रात उडी घेतली असून या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. विशाल गणेश शेंडे (22) आणि दीक्षा मारबते अशी …

अधिक वाचा
error: Content is protected !!