स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर झिंगाट नाचले अन नवरदेव बोहल्यावर चढला…!

0 3

मुंबई:- स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आणि वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी एका कार्यकर्त्याच्या लग्नात आपल्या झिंगाट नृत्याने धमाल उडवून दिली. रवी भाऊ आल्याशिवाय बोहल्यावर चढणार नाही असे सांगणाऱ्या कार्यकर्त्याच्या लग्नात कुठलेही व्हीआयपी कल्चर न जोपासणाऱ्या ह्या युवा नेत्याने आपल्या कार्यकर्त्यांच्या इच्छेखातर ठेका धरला अन शेवटी नवरदेव बोहल्यावर चढला.

त्याचे झाले असे की, बुलढाणा जिल्ह्यातील संदीप भगवान सावळे रा.डोंगरशेवली यांचे लग्न आनवी, ता.सिल्लोड येथील पल्लवी पाटील हिच्याशी झाले. या लग्नाला बरीच व्हीआयपी मंडळी उपस्थित होती. मात्र रविकांत तुपकर येईस्तोवर बोहल्यावर चढणार नाही असा निर्णय नवरदेवाने सांगितला. मग काय, लग्नासाठी आलेले रविकांत तुपकर सरळ वरातीतच पोहोचले. आणि युवावर्गाने त्यांना उचलून खांद्यावर घेतले. तुपकर यांनीही कुठलाही अभिनिवेश न बाळगता कार्यकर्त्यांच्या भावनेचा सन्मान करत बराच वेळ ठेका धरला.

यावर बोलताना तुपकर यांनी सांगितले की, सामान्य लोकांना आणि नागरिकांना नेता हा आपल्यातिल नेता वाटला पाहिजे. यामुळे कुठल्याही कार्यक्रमात मी व्हीआयपी कल्चर ठेवत नाही. काही का असेना या निमित्ताने टिपिकल राजकारणाला तुपकर यांनी फाटा देत नवा पायंडा पाडला आहे.