पुरात अडकलेल्या ३५ लोकांना वाचवण्यात हवाईदलाला यश

0

ठाणे: गेल्या दोन दिवसांपासून मुंबई, ठाणे, पालघर या ठिकाणी मुसळधार पावसाने झोडपले आहे. अनेक ठिकाणी सकल भागात पाणी साचले असून, नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. ठाणे जिल्ह्यातील खडवली जवळ असलेल्या नांदखुरी गावातील ३५ जण पुराच्या पाण्यात अडकले होते. या सर्व जणांना वाचविण्यात भारतीय हवाई दलाला यश आले आहे.

हेलिकॉप्टरच्या सहाय्याने या ३५ जणांना कोलशेत येथे आणण्यात आले आहे. मुंबईसह राज्यात अतिवुष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती घेऊन मुख्यमंत्र्यांनी आपत्कालिन परिस्थितीतील यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच खडवली येथील पुरात अडकलेल्या ३५ ग्रामस्थांची हेलीकॉप्टरच्या माध्यमातून सुटका करावी अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी भारतीय हवाई दलाला केली होती.