सिद्धरामय्या यांच्यासमोर परंपरा मोडण्याचे आव्हान

0

बंगळूर-कर्नाटकात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु असून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासमोर मागच्या ३३ वर्षांपासून सुरु असलेली एक परंपरा मोडण्याचे आव्हान आले. कर्नाटकात १९८५ सालापासून कुठल्याही एका पक्षाला सलग दोन टर्म सत्ता मिळवता आलेली नाही. रामकृष्ण हेगडे यांच्या नेतृत्वाखाली फक्त जनता दलाला कर्नाटकात सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळवता आली होती.

पूर्ण ताकत लावली

१९८५ सालापासून कर्नाटकने तेरा मुख्यमंत्री पाहिले आहे. कर्नाटकातील हीच परंपरा बदलण्याचे सिद्धरामय्या यांच्यासमोर आव्हान आहे. भाजपा आणि काँग्रेसने कर्नाटक जिंकण्यासाठी पूर्ण ताकत पणाला लावली आहे. दक्षिणेत भाजपाने पहिल्यांदा २००८ साली स्वबळावर सरकार स्थापन केले होते. पण पाचवर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर भाजपाला पुन्हा सत्ता मिळवता आली नाही.

भाजपवर भ्रष्ट्राचाराचे आरोप 

अंतर्गत धुसफूस, भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे भाजपाला पराभव झाला. भाजपाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवारी बी.एस.येडियुरप्पा भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन तुरुंगातही होते. पुन्हा एकदा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने कंबर कसली आहे. कर्नाटकात काँग्रेस आणि भाजपा या दोन पक्षांमध्ये मुख्य लढत आहे. जनता दल सेक्युलर किंगमेकर ठरेल असा बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी तामिळनाडूच्या धर्तीवर इंदिरा कँटिनसारख्या कल्याणकारी योजना सुरु केल्या आहे. काँग्रेसची विजयासाठी भिस्त अशाच योजनांवर आहे.