देश सुरक्षित हातामध्ये आहे ; पंतप्रधान मोदींचा विश्वास

0

चुरू-आज पुलवामा येथील भ्याड हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत भारतीय वायूसेनेने पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त केले आहे. यात ३५० पेक्षा अधिक दहशतवादी ठार झाले आहे. आजपर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. दरम्यान आजच राजस्थानमधील चुरू येथे मोदींची सभा होत आहे. यावेळी सभेला संबोधित करताना मोदींनी देश सुरक्षित हातामध्ये आहे असा विश्वास पुन्हा देशाचा जनतेला दिला. यावेळी त्यांनी २०१४ मधील ‘सौगंध मुझे में देश को झुकणे नही दुंगा’ या वाक्याचा पुनरुच्चार केला.

देशापेक्षा मोठे काहीच असू शकत नाही असे यावेळी मोदींनी सांगितले. स्वत पेक्षा पक्ष आणि पक्षापेक्षा देश मोठा आहे या भावनेतून आम्ही आजपर्यंत काम करत आलो आहोत असे मोदींनी यावेळी सांगितले.