सत्ता देणारा नथुराम हा सगळ्यांना आवडायला लागला: जितेंद्र आव्हाड

0

मुंबईः आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुंबई चे आमदार, तथा माजी मंत्री सचिन अहिर हे शिवसेनेत प्रवेश करणार आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विषयावर प्रतिक्रिया देत पवार साहेबांनी पक्षातल्या सामान्य कार्यकर्त्याला मोठे केले असल्याचे सांगितले आहे. सध्या सत्ता देणारा नथुराम हा सगळ्यांना आवडायला लागला असल्याचा टोला त्यांनी लगावला. अहिर यांना पवार साहेबांनी मोठे केले. अहिर याना मंत्रीपद मिळावे म्हणून मी मध्यस्थी केली असल्याचे सांगितले.

सत्ता देणारा नथुराम हा सर्वांना आवडायला लागला आहे. गांधी आता सत्ता देऊ शकत नसल्याने जनता नथुरामाच्या पायाशी लोळण घेत आहे. ८० वय असतानाही पवारसाहेब दुष्काळ दौरे करतायत. साहेबांनी आम्हाला कुठल्या कुठे नेऊन ठेवले असल्याचा पुनरुच्चार त्यांनी आहे, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

काही जितेंद्र आव्हाड यांनी राफेल प्रकरणावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर निशाणा साधला होता. पंतप्रधान मोदींवर आव्हाड यांनी यावेळी एका गाण्याच्या माध्यमातून टीका केली होती. पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इम्रान खानला शुभेच्छा पाठवल्या, यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. पाकिस्तान हा जर इतका बदमाश देश आहे तर मग त्याला हे चोरून प्रेमपत्र पाठवायची काय आवश्यकता आहे? असा प्रश्न आव्हाडांनी उपस्थित केला होता.