आर.एस.शर्मा यांचे बँक खाते हॅक!

0

नवी दिल्ली-आधार क्रमांक सार्वजनिक करणे यावरुन देशात नव्याने वाद सुरू झाला आहे. ट्रायचे चेअरमन आर.एस.शर्मा यांनी आधार क्रमांक सार्वजनिक केला आणि यामुळे गोपनीयतेला धक्का पोहोचत नाही किंवा माहिती हॅक करता येत नाही, असा दावा केला होता. त्यानंतर इलियट अँडरसन या फ्रान्सच्या सुरक्षा तज्ज्ञाने तर शर्मा यांची गोपनीय माहिती उघड केली. आता एथिकल हॅकर्स या ग्रुपने शर्मा यांचे बॅंक डिटेल्स मिळाल्याचा दावा केला आहे. त्यांनी शर्मा यांना पेटीएम आणि भिम अॅपद्वारे १ रुपया पाठवल्याचा स्क्रिनशॉटही शेअर केला आहे.

शर्मा यांच्या पीएनबी, एसबीआय, कोटक महिंद्रा, बॅंक ऑफ इंडिया आणि आयसीआयसीआय बँकेचा तपशिल आणि आयएफएससी कोड मिळवल्याचा दावा केला आहे, याद्वारे शर्मा यांना १ रुपया पाठवल्याचे हॅकर्सनी म्हटले आहे. तुमच्या परवानगीशिवाय पैसे खात्यात आल्याने ब्लॅकमेलिंग, मनी लॉन्ड्रिंग यांसारख्या अडचणी निर्माण होऊ शकतात असा इशाराही हॅकरने दिला आहे.