सेनेकडून जनादेशाचा अपमान, ट्वीटरवर ShivSenaCheatsMaharashtra ट्रेण्ड !

0

मुंबई: राज्यात भाजप-शिवसेनेत मुख्यमंत्री पदावरून बिनसले असल्याने भाजपने सत्ता स्थापन करण्यास नकार दिला आहे. काल रविवारी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर जनतेने महायुतीला जनादेश दिला असताना शिवसेनेने भाजपला पाठींबा न देऊन जनादेशाचा अपमान केल्याचे आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते. याचे पडसाद आता सोशल मीडियातून उमटत आहे. ट्वीटरवर देखील शिवसेनेवर रोष व्यक्त होत आहे. ट्वीटरवर आज ShivSenaCheatsMaharashtra ट्रेण्ड होत आहे. शिवसेनेने जनमताचा अनादर केल्याचे मत व्यक्त होत आहे. दुसरीकडे ट्वीटरवर MaharashtraWithShivsena हे देखील दुसऱ्या क्रमांकावर ट्रेण्ड होत आहे.

सेनेकडून जनादेशाचा अपमान, ट्वीटरवर ShivSenaCheatsMaharashtra ट्रेण्ड ! 1

भाजपकडून शिवसेनेवर जनादेशाचा अपमान केल्याच्या आरोपावर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राज्यातील जनतेने सत्तेसाठी जनादेश दिला असतानाही, आम्ही विरोधी पक्षात बसू पण मित्रपक्षाशी चर्चा करणार नाही अशी भूमिका घेतल्याने भारतीय जनता पक्षाच्या अहंकाराने जनादेशाचा अपमान केला आहे, अशा शब्दांत पलटवार केला आहे.