गुरुशिष्य परंपरा माणसाला निर्भय करणारी

0

हभप दादा महाराज यांच्या हस्ते डॉ. उल्हास पाटील, डॉ. राजेंद्र पाटील यांचा सत्कार

जळगाव ः भारतीय संस्कृती मातृशक्तीवर आधारीत असून गुरुशिष्य परंपरा माणसाला निर्भय करते असे ह.भ.प.दादामहाराज जोशी यांनी प्रतिपादन केले.
कै.वैद्य भालचंद्र शंकर जहागिरदार प्रतिष्ठानतर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त आयएमए हॉल येथे ज्येष्ठ डॉक्टरांच्या कृतज्ञता सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रतिष्ठानचे अध्यक्ष वैद्य जयंत जहागिरदार, सत्कारमूर्ती डॉ.उल्हास पाटील व बालरोग तज्ञ डॉ.राजेंद्र पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. ह.भ.प.जोशी यांनी प्रतिष्ठानतर्फे डॉक्टरांविषयी कृतज्ञता म्हणजे वंदन करण्याचे कार्य आहे. कारण सत्कारमुर्ती म्हणजे मूर्तीत देवत्व असते आणि डॉक्टर म्हणजे धन्वंतरी अर्थात विष्णूचे रुपच आहे. स्वकर्तृत्व सर्वश्रेष्ठ असते. अशा कर्तृत्ववान डॉक्टरांचा गुरुपौणिमेला सत्कार करणे ही आदर्श गुरु परंपरा असून ती माणसाला निर्भय बनविते असे सांगितले. प्रारंभी दिपप्रज्वलन, धन्वंतरी पुजन झाले. वैद्य योगेंद्र कासट यांनी धन्वंतरी स्तवन सादर केले. परिचय वैद्य अमित चौधरी यांनी करुन दिला.स्वागत सौ.माधुरी व मधुरा जहागिरदार यांनी केले. यावेळी सत्कारमूर्ती डॉ.उल्हास पाटील व डॉ.राजेंद्र पाटील यांना दादा महाराज जोशी यांच्या जोशी हस्ते पुष्पहार, शाल, श्रीफळ, भेटवस्तू व स्मृतीचिन्ह देऊन सन्मानीत करण्यात आले. यावेळी उल्लेखनीय कार्याबद्दल वैद्य नरेंद्र गुजराथी, वैद्य हेमंत बाविस्कर आणि एन.डी.पाटील, आरती पाटील, प्रिती गुजराथी, सौ. बाविस्कर आदिंचा सत्कार करण्यात आला.


राजकारणापेक्षा वैद्यकीय सेवा बरी – डॉ. उल्हास पाटील
सत्काराला उत्तर देतांना डॉ.उल्हास पाटील यांनी शिक्षणापासून वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना असा प्रवास सांगितला. पुरुष डॉक्टरांनी स्त्रीरोग तज्ञ म्हणून कार्य करण्यास डॉ.अविनाश आचार्य यांच्या कार्यपद्धतीमुळे शक्य झाले असे सांगून राजकारणापेक्षा वैद्यकीय सेवा कायम असते या तत्वानुसार लवकरच आयुर्वेद कॉलेज सुरु करण्याचा मानस व्यक्त केला. डॉ.राजेंद्र पाटील यांनी वडिलच शिक्षक असल्यामुळे घरी आणि शाळेत तेच गुरु तसेच घर म्हणजेच गुरुकुल झाल्याने चांगले संस्कार झाले. जे चांगले आहे ते गुरुंचे आणि ते वाईट आहे ते माझे अशी भावना व्यक्त केली. आभार वैद्य जयंत जहागिरदार यांनी मानले.सूत्रसंचालन वैद्य आनंद दशपूत्रे यांनी केले.