VIDEO…आणि रोहित पवारांनी केला मोदींना फोन !

0

संगमनेर: संगमनेर येथे युवा संवाद कार्यक्रम घेण्यात आला. यात युवा आमदारांशी संवाद साधण्यात आले. या कार्यक्रमासाठी युवा आमदार मंत्री आदित्य ठाकरे, आमदार रोहित पवार, आदिती तटकरे, झीशान सिद्धिकी, धीरज देशमुख, ऋतुराज पाटील उपस्थित होते. यावेळी मराठी सिनेअभिनेते संगीतकार अवधूत गुप्ते यांनी सहाही युवा आमदारांची मुलाखत घेतली. मुलाखती दरम्यान अवधूत गुप्ते यांनी गुप्ते तिथे खुप्ते या कार्यक्रमाच्या धर्तीवर सगळ्यांना कोणाला तरी एक फोन करून संवाद साधण्याचे सांगितले. खरोखरच फोन लावायचे नव्हते तर केवळ तशी कृती करून संवाद साधायचे होते. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला. मोदींना फोन करून रोहित पवार यांनी देशातील तरुणांना रोजगाराची आवश्यकता असून रोजगार उपलब्ध करून देण्याबाबत विनंती केली. देशातील तरुण हा बेरोजगार असल्याने निराशाजनक आयुष्य जगत आहे. निराशेतून बाहेर काढण्यासाठी युवकांना रोजगार उपलब्ध करून द्या असे आवाहन रोहित पवार यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोनवरून केले.

मात्र हा एक खेळ होता. खरोखरच फोन केलेला नव्हता. केवळ तशी कृती करायची असल्याने त्यांनी मोदींना फोन केला.