कॅलिफोर्निया – व्हॉट्सअॅप यूजर्ससाठी महत्त्वाची बातमी आहे. व्हॉट्सअॅपच्या (whatsapp) वापराच्या 8 फेब्रुवारी 2021 पासून नवीन अटी, सेवाशर्ती (policy) लागू होत आहे. त्या पूर्णपणे स्वीकारल्या तरच यूजर्सला व्हॉट्सअॅप वापरता येणार आहे.
व्हॉट्सअॅपकडून मंगळवारपासून यूजर्सला एक नोटीफिकेशन पाठवण्यात येत आहे. त्यात म्हटले आहे की, फेब्रुवारी 2021 पासून सेवांच्या नवीन अटी लागू करण्यात येत आहेत. जर आपण व्हॉट्सअॅपच्या सेवेच्या अटी मान्य न केल्यास आपण आपले व्हॉट्सअॅप अकाऊंट डिलीट करू शकता. व्हॉट्सअॅपच्या प्रवक्त्याने गेल्या महिन्यात नवीन अटींची माहिती देत म्हटले होते की, व्हॉट्सअॅप वापरण्यासाठी त्याच्या अटींशी सहमत असणे आवश्यक आहे. नवीन पॉलिसीत युजर्सचा आधीच्या तुलनेत जास्त डेटा फेसबुककडे राहिल. व्हॉट्सअॅपचा डेटा आधीच फेसबुक सोबत शेयर केला जात होता.
ऑडिओ-व्हिडिओ कॉलिंग
व्हॉट्सअॅपच्या वेब व्हर्जनवर लवकरच ऑडिओ-व्हिडिओ कॉलिंग सुविधा मिळणार आहे. त्यामुळे व्हॉट्सअॅप अॅपप्रमाणेच लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवरून व्हिडिओ-ऑडिओ कॉलिंग करता येणे शक्य होणार आहे. सध्या झूम, गुगल मीट अशा तर्हेची सेवा देत असून, त्यांचा वापर मोठ्या संख्येने होत आहे.