व्हॉट्सअप ग्रुप अडमिनने ग्रुपमधील संवाद सेटिंग बदलली

0

मुंबई: बहुचर्चित अयोध्यानिकालावर आज देशातील सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. सोशल मीडियावर उमटणाऱ्या प्रतिक्रियांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येकाने ‘सोशल भान’ राखावे असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. सोशल मीडियावर यासंदर्भात आलेली कोणतीही पोस्ट शहानिशा केल्याशिवाय पुढे पाठवू नये. दरम्यान, पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनने ग्रुपमधील संवाद सेटिंग बदलली आहे. बहुतांश ग्रुपवर सदस्यांना पोस्ट करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

सोशल मिडीयावर पोलिसांचे बारीक लक्ष आहे. धार्मिक भावना दुखावल्या जातील असे फोटो, व्हिडीओ फॉरवर्ड करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.