पिंपरी-चिंचवडमधील महिला पत्रकाराची आत्महत्या !

0

पिंपरी : पिंपरी – चिंचवड महिला पत्रकार संघाच्या माजी अध्यक्षा तसेच दैनिक प्रभातच्या उपसंपादक वरिष्ठ पत्रकार निशा पाटील-पिसे यांनी गुरूवारी ३१ रोजी रात्री नऊच्या सुमारास पिंपरी येथे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. घरगुती कारणावरून त्यांनी आत्महत्या केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

याप्रकरणी निशा यांचे भाऊ महेश शिंगोटे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. निशा यांचा पती प्रशांत पांडुरंग पिसे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुरुवारी रात्री कार्यालयातून घरी आल्यावर निशा यांनी त्यांच्या खोलीचा दरवाजा आतून बंद करून घेत गळफास घेतला. याबाबत माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर शुक्रवारी सकाळी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर त्यांच्या मूळगावी उंब्रज (ता. जुन्नर) येथे मृतदेह नेण्यात आला.